Agriculture Solar Pump : सोलर पंपाची रक्कम भरली ; पण पंप वाटपाचा पत्ताच नाही

Agriculture Solar Pump राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेखाली अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सोलर पंपासाठी कंपनीची निवड करण्यासाठी चॉइस मिळालेली नाही.

यामुळे शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Agriculture Solar Pump

रात्री-बेरात्री शेतकऱ्यांची विजेच्या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी शेतकऱ्यांना सोलार पंप वापरण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून सोलार पंप मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती भ्रमनिराशा होत चालली आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोलार पंप मिळविण्यासाठी अर्ज व पैसे भरले. मात्र सोलर पंप मिळविण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. शेतकऱ्याला सोलर पंप मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री, तर आठ दिवस दिवसा वीज मिळते. मात्र, विजेची समस्या सतत जाणवत आहे. सतत वीज यंत्रणेत होणारे बिघाड, रोहित्रामधील बिघाड यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला जगविण्यासाठी पिकांना पाणी देता येईना. Agriculture Solar Pump

रात्रीच्या वेळेस पिके, फळबागांना पाणी देताना साप, विंचू-काटा आदींपासून धोके उद्‍भवतात. त्यातच विजेचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण होऊन बसले आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी सोलार पंप वरदान ठरते.

Leave a Comment