राज्यात ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र, या महिलांना पैसे परत करावे लागणार का ? ladki bahin update

ladki bahin update मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये सुरु केली आहे या योजनेंतर्गत महिलांना प्रतीमाह १५०० रुपये देण्यात येते.

या योजनेंतर्गत आतापर्यंत मिळणार ७ हप्ते देण्यात आले आहे शासनाने या योजनेत वाढ करून महिलांना २१०० रुपये प्रतीमाह देण्याची घोषणा देखील केली आहे. ladki bahin update

परतू आता मात्र लाडकी बहिण योजनेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे यामध्ये कधी महिला अपात्र ठरत आहे या अपात्र ठरलेल्या महिलांना आता पुढील हप्ता मिळणार नाही असे दिसत आहे.

राज्य शासनाने माझी लाडकी बहिण योजनेत मोठी पडताळणी सुरु केली आहे त्यानुसार राज्यातील ५ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे.

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक 3 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या महिलांना माझी लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात येत आहे. ladki bahin update

अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थीचे वितरण खालीलप्रमाणे

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ; २,३०,०००
  • वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला ; १,१०,०००
  • कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वतः नाव मागे घेणाऱ्या महिला ; १,६०,०००
  • एकूण अपात्र महिला ५,०००००

या अपात्र ठरलेल्या महिलाकडून पैसे परत घेणार का ?

ज्या ५ लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे त्या महिलांना आता येथून पुढे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्यांना आतापर्यंत लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही अशी माहिती महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यादी दिली आहे.

Leave a Comment