Namo Shetkari Hapta : नमो शेतकरीच्या ६ व्या हप्त्याचा निर्णय झाला; हप्ता मिळणार का? वाचा सविस्तर

Namo Shetkari Hapta केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) दिला जाणार आहे. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी पाच ऑक्टोबर रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. Namo Shetkari Hapta

याचवेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्तादेखील देण्यात आला. त्यानंतर डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या चार महिन्यांसाठीचा पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) वितरित होणार आहे.

बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.

यासाठी १ हजार ९६७ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Namo Shetkari Hapta

पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचे जिल्हानिहाय शेतकरी

जिल्हाशेतकरीरक्कम (कोटींत)
अहिल्यानगर५,४९,९७३११४.६५
अकोला१,९०,५४७४०.७३
अमरावती२,७३,७७०५७.४४
छ. संभाजीनगर३,४५,५८९७१.३३
बीड३,७८,१३३७९.६८
भंडारा२,१९,३८१४६.४५
बुलढाणा३,४४,५०६७३.५८
चंद्रपूर२,५०,२९५५३.१५
धुळे१,५७,२१५३५.०१
गडचिरोली१,५२,३९७३२.४२
गोंदिया२,२२,३६१४६.५५
हिंगोली१,७७,०२२३६.०२
जळगाव४,०७,८४२८८.१८
जालना३,००,११४६३.९९
कोल्हापूर४,८२,८०४१०४.८१
लातूर२,७१,८६४५६.९०
नागपूर१,८०,४९२३९.९९
नांदेड३,८६,००३७२.२७
नंदूरबार१,०४,७१८२२.१९
नाशिक४,४१,७३१९२.९५
धाराशिव२,३७,५२२५०.९६
पालघर९९,६७९२१.११
परभणी२,५१,९३१५२.२४
पुणे४,४३,६४९९३.०४
रायगड१,१६,९६०२५.५९
रत्नागिरी१,५७,८५८३४.८०
सांगली४,००,४४७८३.६४
सातारा४,५०,६६०९५.४९
सिंधुदुर्ग१,२२,२६५२५.८१
सोलापूर५,०३,०९२१०७.१५
ठाणे७४,९६९१६.२२
वर्धा१,३०,७५१२७.४६
वाशिम१,६७,३२१३६.३०
यवतमाळ२,९४,००५६१.९८
एकूण९२,८८,८६४१९६७.०८

Leave a Comment